मुंबई मेरी जान …!!!

मुंबई मेरी जान …!!!

मुंबई वरून जाणारा प्रत्येक माणूस हा positive च असतो का?, मग तो चालत जाणारा आसो, या माल वाहतूक करणारा, मग कशासाठी जायचं गावी, त्या पेक्षा मुंबई बरी, इथे अजून शेजार धर्म तरी चांगला चालला आहे, जर गावी आपली माणसे, आपली भावकी, आपले भाऊबंद, आपले शेजारपाजारी विचारात नसतील, दुर्लक्ष करत असतील  तर इकडे काय वाईट आहे, इकडे तर शेजार पाजार चे तरी अजून पर्यंत चांगली वागणूक देत आहेत. कुणी रक्ताचं नाही कुणी जातीच नाही, तरी एक मेकांच्या वेळ प्रसंगाला धाऊन  येत आहेत, मग इकडे काय वाईट आहे, गावाला जाऊन आपल्या लोकांमध्ये परकं होण्यापेक्षा परक्या लोकांमध्ये आपलं म्हणून राहिलेलं काय वाईट. त्या पेक्षा मुंबई बरी, मुंबई मेरी जान.. सर्वांच्या बोलण्यातून असा वाटतं आहे की गावच्या पेक्षा Corona बरा, निदान  बरा तरी होतो, वेळ सगळ्यावर येते पावसाने गावं पाण्याखाली नेली मुंबईने मदत केली.. आता मुंबई वरती वेळ आली तर गावचे लोकं स्वार्थी झाली… गावातील सर्वजण आपल्या कडे अपराधी नजरेने बगण्या पेक्षा मुंबई बरी, गावातील आपल्या लोकांच्या दुनियादारी पेक्षा दुनियाभरातल्या लोकांमधला आपलेपणा चांगला, मुंबईमध्ये कोणाचं कुणाला देणं नाही कोणाकडून काही घेणं नाही, एकमेकांवर जळणार नाही एकमेकाचे पाय खेचणार नाही.. चालणार तर सोबत आणि थांबणार तर सोबतच….

Article By : Kiran Khot, Santacruz

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *