
काय राव .... काय राव कशे आहात,
प्रश्न काही आले आहेत हो मनात.
व्यस्त नसाल आपण तर
विचारू का या काळात
वेळोवेळी तुम्ही ओढुनी ती एक काढी, सर्विकडे धूर उडवीत होतात.
आता कशे कोरोना नाशक धुरवल्याची वाट पाहत, राहता की हो घरात.
सगळे पेय सोडूनि दारू पियुनि , त्रास बनला होता तुम्ही जगात.
आता कसे कोरोना ची भीती गिळत, वावरता हो घरात.
चरस , गांजा आनंद म्हणून जाळीत राहिले, कधी आले ही नसेल विचारात.
की पसरणाऱ्या आजाराच्या भीतीने नशा आणि नाश यातील फरक कळेल की हो अस्तित्वात.
अरे नको, नाका आठवू त्या आठवणी आता, फक्त पहा आपल्या घरात,
बोलुनी, खेळुनी परिवारामध्ये तुम्ही स्वर्गसुख भोगत आहात.
व्यसन सोडवत नसेल तर पडा पुनः व्यसनाच्या वेडात,
प्रेम, माया आपुलकीच्या झोकून द्या की हो व्यसनात.
काव्यरचनाकार – श्री अनिकेत घनश्याम भंकाळ