जन्मलो जेव्हा तेव्हा अस्तित्वाची जाणीव नव्हती,
ते होते दोघे जोपासून आम्हांला, म्हणून कोणतीही उणीव नव्हती.
स्थिती तेव्हा बिकट होतीच, पण त्याचा त्रास जराही वाटू दिला नाही,
परिस्थितीशी झुंज दिली पण धक्का आम्हांला जराही लागू दिला नाही.
आईने मायेचा ओझर वाहिला तर रक्ताचे अश्रूही ढाळले,
बापाने परिश्रमाचे डोंगर चढुनी रक्ताचे घाम गाळले.
समजू लागले जेंव्हा तेव्हा मनाला एकच विचार पडला,
मनुष्य आहेत ते की देवांचा अंश हा एकच प्रश्न अडला.
खूप विचारमंथनानंतर एक उत्तर आम्हांला सापडले,
पण त्या उत्तरात ही एक ना सुटणारे कोढे आहे दडले.
आई जणू आत्मा ईश्वराचा की आपत्त्याचा ईश्वर,
आणि बाप आहे बालक परमेश्वराचा की स्वयं बालक-बालिकेचा परमेश्वर.
भावनांचा प्रवाह जन्मला ज्यांच्यामुळे या देहात,
हे भावनात्मक काव्य हृदयातून उपजले त्यांच्या प्रेमात
काव्यरचनाकार - श्री अनिकेत घनश्याम भंकाळ,
निर्मल नगर, वांद्रे पूर्व
श्री घनश्याम महादेव भंकाळ व
श्रीमती प्राची घनश्याम भंकाळ यांचा पुत्र.